Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

जनकल्याण रक्तकेंद्रातर्फे नितीन पांडे यांचा सन्मान



मनमाडमध्ये २२ वर्षे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन; लासलगाव येथे गौरव सोहळा संपन्न

लासलगाव : जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिकच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त लासलगाव येथे रक्तदान शिबिर संयोजकांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, येवला व चांदवड परिसरातील शतकवीर, अर्धशतकवीर तसेच सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या संयोजकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात भाजपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पांडे यांनी मनमाड शहरात भाजपच्या माध्यमातून सन २००५ पासून २०२६ पर्यंत सलग २२ वर्षे दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी अखंड भारत दिनानिमित्त नियमित रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण रक्तदान चळवळीतील योगदानाची दखल घेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

निफाड तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उत्तमराव डेर्ले, कार्यक्रमाचे अध्यक्ष जनरल फिजिशियन डॉ. श्रीनिवास दायमा, जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत निधी प्रमुख प्रमोद क्षिरसागर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाशिक विभाग संघचालक कैलास साळुंखे आणि जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी भाजप मनमाड शहर सरचिटणीस आनंद काकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत प्रचार मंडळ सदस्य रमाकांत मंत्री, भाजप नाशिक जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे, भाजप महिला मोर्चा सरचिटणीस सौ. स्मिताताई कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवा प्रमुख प्रमोद मुळे, किशोर कुडाळ, भारतीय मजदूर संघाचे श्रावणदादा जावळे, भाजप पाटोदा मंडल अध्यक्ष संतोष काटे, वनवासी कल्याण आश्रमचे विवेक हातेकर, सुभाष वाघ, गौरव मुळे, जनकल्याण रक्तकेंद्राचे सहकार्यवाह मदन भंदुरे, सचिदानंद फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.

“ऐच्छिक रक्तदात्यांच्या सहकार्यामुळेच दरवर्षी रक्तदान शिबिर यशस्वीपणे आयोजित करता येते. रक्तदानाची ही चळवळ अशीच पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे नितीन पांडे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात ५० पेक्षा अधिक रक्तदान शिबिर संयोजकांचा सन्मान करण्यात आला. जनकल्याण रक्तकेंद्राचे प्रशासकीय अधिकारी विनय शौचे, सतीश राय, प्रदीप देशमुख, अरुण कुलकर्णी, सौरभ बावनकुळे, चेतन निकम, केशव गोडसे, देविदास भांगरे, उमेश गांधले, प्रा. रामनाथ कदम, शरद गायकवाड, सोमनाथ उगलमुगले, ज्ञानेश्वर गिलडा तसेच पदाधिकारी व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
रक्तदान चळवळीतील कार्यकर्ते, रक्तदाते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नितीन पांडे यांच्या २२ वर्षांच्या सातत्यपूर्ण रक्तदान शिबिर आयोजनाचा गौरव हा मनमाडच्या रक्तदान चळवळीला मिळालेली विशेष दाद ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या