Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

ॲड. फरिदा नुरुद्दीन मिठाईवाला यांचा आघाडी मनमाडतर्फे सत्कार

 


मनमाड : जश्न-ए-ईद मिलाद-उन-नबी ﷺ च्या पवित्र प्रसंगी मनमाड (नांदगाव) येथील दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने समाजासाठी उल्लेखनीय कार्य व सेवा करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात कायदेविषयक क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या ॲड. फरिदा नुरुद्दीन मिठाईवाला यांना “Excellence in Legal Service” (कायदेशीर सेवेमधील उत्कृष्टता) या श्रेणीत “शहादत-ए-तकदीर” प्रशस्तीपत्रक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कायदेविषयक क्षेत्रातील त्यांची उत्कृष्ट सेवा, समर्पण तसेच समाजासाठीचे योगदान लक्षात घेऊन त्यांना हा गौरव प्राप्त झाला. त्यांच्या या उल्लेखनीय सन्मानाबद्दल वंचित बहुजन आघाडी, मनमाड यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास अहिरे, जिल्हा सचिव कादिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, तसेच अमोल केदारे, खुशाल थोरात, अशपाक शाह, निलेश निकम, सागर गाडे, सुनील बागुल यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲड. फरिदा नुरुद्दीन मिठाईवाला यांच्या या सन्मानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व कायदेविषयक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
“मानवतेची सेवा… हीच खरी सेवा!”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या