मनमाड : मनमाड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक आता २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिकच्या नगरविकास शाखेने याबाबत विशेष सभेची अधिकृत नोटीस जारी केली आहे. सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता मनमाड नगरपरिषदेत ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
मनमाड नगरपरिषदेचे तत्कालीन उपनगराध्यक्ष मुकुंद गौतम एलीजे यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा नगराध्यक्षांनी मंजूर केल्यानंतर उपाध्यक्षपद रिक्त झाले. याबाबत मुख्याधिकारी, मनमाड नगरपरिषद यांनी ६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले होते.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील संबंधित तरतुदींनुसार रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदाची निवडणूक घेणे आवश्यक असल्याने ही विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी तहसीलदार, नांदगाव यांना पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशानुसार मनमाड नगरपरिषदेतील निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी या विशेष सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे आता मनमाड नगरपरिषदेचा नवा उपाध्यक्ष कोण होणार? याकडे शहरातील राजकीय वर्तुळासह नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याची उत्सुकता वाढली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या