मनमाडच्या दोन गुणवंतांचा गौरव. ऋतुजा चिनुके यांची मर्चेंट नेव्हीत इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणून नियुक्ती; गायक आसिफ मन्सूरी यांची मुंबईतील गायन स्पर्धेत निवड
मनमाड : मनमाड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या दोन गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा नुकताच शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मनमाडची भूमिकन्या कु. ऋतुजा संतोष चिनुके हिची मर्चेंट नेव्हीमध्ये इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल, तसेच मनमाडचे ख्यातनाम गायक आसिफ मो. शफी मन्सूरी यांची मुंबई येथे आर.एफ.सी.एम. रफी फॅन क्लब या संस्थेने आयोजित केलेल्या गायन स्पर्धेसाठी भारतात प्रथम निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. मनमाड शहरातील श्री छत्रपती ना. जि. पतसंस्थेचे अल्पबचत प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते संतोष चिनुके यांची सुकन्या कु. ऋतुजा संतोष चिनुके हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मर्चेंट नेव्हीमध्ये इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे मनमाड शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, तिच्या यशामुळे मनमाडच्या तरुणींना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
तसेच मनमाड येथील प्रसिद्ध गायक आसिफ मो. शफी मन्सूरी यांची मुंबई येथे आर.एफ.सी.एम. रफी फॅन क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आपल्या दमदार आवाजाने आणि गायनाच्या कलेने रसिकांच्या मनावर ठसा उमटविणाऱ्या आसिफ मन्सूरी यांच्या या निवडीबद्दलही त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मनमाड शहरातील या दोन्ही गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा ऍड फरीदा मिठाईवाला तर्फे शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. ऋतुजा चिनुके आणि आसिफ मन्सूरी यांच्या यशामुळे मनमाड शहराच्या शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिक क्षेत्राच्या लौकिकात भर पडली असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या वेळी ऍड फरीदा मिठाईवाला. व समीना खान तसेच कादिर शेख. सद्दाम अत्तार. युसूफ मिठाईवाला. नितीन चिनुके. अहेमद शेख. इतर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या