Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

प्रशासनाने स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवावेत, अन्यथा पालिका पायरीवर 'खिळे ठोको' आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड पालिकेला इशारा

 

मनमाड: शहरातील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय काळात बसवण्यात आलेले रबरी व फायबरचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही महिन्यांतच पूर्णपणे उखडून गायब झाले आहेत. सध्या रस्त्यावर हे स्पीड ब्रेकर फिक्स करण्यासाठी वापरलेले तीक्ष्ण लोखंडी खिळे आणि बोल्ट उघडे पडल्याने वाहनधारक व पादचाऱ्यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या गंभीर प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, प्रशासनाने हे धोकादायक उघडे खिळे व बोल्ट त्वरित काढून नवीन स्पीड ब्रेकर बसवावेत;अन्यथा मनमाड नगरपालिकेच्या पायरीवर 'खिळे ठोको' आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा पक्षाचे मनमाड शहर अध्यक्ष विलास आहीरे यांनी मुख्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, रस्त्यावर उघडे पडलेले लोखंडी खिळे दुचाकीस्वारांच्या आणि पादचाऱ्यांच्या सहजासहजी लक्षात येत नाहीत. त्यामुळे वाहने घसरून किंवा आदळून गंभीर अपघात घडत आहेत. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर होऊन व फाटून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे


पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या वेळी किंवा अंधारात पादचाऱ्यांचा पाय या खिळ्यांवर लागून गंभीर दुखापत होण्याची शक्यता वाढली आहे. 

या समस्येची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगल्या दर्जाचे नवीन गतीरोधक (स्पीड ब्रेकर) बसवावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनासोबत घटनास्थळाचे G.P.S. फोटो जोडण्यात आले आहेत.


या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे,अमोल केदारे, अशपाक शाह, खुशाल थोरात,रूपेश जाधव सागर गाडे, सुनील बागुल,यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या