आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नांना यश; ऑगस्ट व सप्टेंबर २०२६ या दोन महिन्यांसाठी योजना लागू..... नगराध्यक्ष योगेश पाटील
मनमाड प्रतिनिधी .आ. सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच मा. फरानदादा खान आणि मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष . योगेश पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मनमाड शहरातील मालमत्ता कर व घरपट्टी थकबाकीदार नागरिकांसाठी मोठी दिलासादायक संधी उपलब्ध झाली आहे. मनमाड शहरासाठी पुन्हा एकदा अभय योजना लागू करण्यात आली असून, या योजनेचा लाभ घेऊन नागरिकांना आपल्या थकीत मालमत्ता कराची रक्कम भरण्याची संधी मिळणार आहे.
मनमाड शहरातील ज्या मालमत्ता धारकांकडे मालमत्ता कर अथवा घरपट्टीची थकबाकी आहे, अशा थकबाकीच्या रकमेवर नियमानुसार दरमहा २ टक्के व्याज आकारण्यात येते. त्यामुळे अनेक नागरिकांच्या थकीत कराच्या रकमेसोबत व्याजाची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा थकबाकीदार मालमत्ता धारकांना दिलासा देण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेअंतर्गत मालमत्ता कर किंवा घरपट्टीच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेवर ५० टक्के सूट अथवा माफी देण्यात येणार आहे.
सदर अभय योजना ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर अथवा घरपट्टीची थकबाकी आहे, त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत कराची रक्कम तातडीने भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेमुळे अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांना व्याजाच्या वाढत्या बोजातून काही प्रमाणात दिलासा मिळणार असून, थकीत कर भरण्याची ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नागरिकांनी योजनेची मुदत संपण्यापूर्वी संबंधित कराची रक्कम भरून ५० टक्के व्याजमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष . योगेश पाटील आणि मुख्याधिकारी. शेषराव चौधरी यांनी केले आहे.
दरम्यान, अभय योजनेची मुदत केवळ दोन महिन्यांची असल्याने संबंधित मालमत्ता धारकांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता लवकरात लवकर आपली थकबाकी भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या