Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नांदगावमध्ये दुर्मिळ उदमांजराचे यशस्वी रेस्क्यू; वन्यजीव संरक्षण संस्थेची पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी

 

नांदगावमध्ये दुर्मिळ उदमांजराचे यशस्वी रेस्क्यू; वन्यजीव संरक्षण संस्थेची पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी

नांदगाव (प्रतिनिधी): नांदगाव परिसरात आढळून आलेल्या दुर्मिळ उदमांजर (Asian Palm Civet) या वन्य प्राण्याचे वन विभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. या प्राण्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

ही संपूर्ण बचाव मोहीम नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वन्यजीव संरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मंगेश आहेर, वनाधिकारी संतोष दराडे, विष्णू राठोड, पाटील दादा, टेकनर दादा तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर निकुंभ यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांच्या समन्वयातून उदमांजराला अत्यंत काळजीपूर्वक रेस्क्यू करून सुरक्षितपणे वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

उदमांजर (Asian Palm Civet) हा मांजर कुळातील नसून, रात्रीच्या वेळी सक्रिय असणारा आणि प्रामुख्याने फळे, कीटक तसेच लहान जीवांवर उपजीविका करणारा वन्य प्राणी आहे. महाराष्ट्रात याला 'मसण्या उद' किंवा 'काळे मांजर' या नावानेही ओळखले जाते. साधारण दोन ते अडीच फूट लांबी, चार ते पाच किलो वजन, काळसर रंग, राठ केस आणि लांब झुपकेदार शेपटी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. गुदद्वाराजवळील विशेष ग्रंथींमधून उग्र वासाचा स्त्राव सोडण्याच्या सवयीमुळे त्याला 'उदमांजर' हे नाव पडले आहे.

विशेष म्हणजे, नांदगाव परिसरात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या टीमने आतापर्यंत तब्बल तीन वेळा उदमांजराचे यशस्वी रेस्क्यू केले असून, त्याची अधिकृत नोंद वन विभागाकडे आहे. वन्यजीवांचे संवर्धन आणि सुरक्षित पुनर्वसनासाठी संस्थेचे सातत्याने सुरू असलेले कार्य कौतुकास्पद मानले जात आहे.
वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे वन्य प्राणी आढळल्यास त्यांना कोणतीही इजा न करता किंवा घाबरवून न लावता तात्काळ वन विभाग अथवा वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क साधावा. नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा दुर्मिळ वन्यजीवांचे प्राण वाचविणे आणि त्यांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्वसन करणे शक्य होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या