Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन; शहरभर उत्साह, घोषणाबाजी आणि विचारांना उजाळा

 


मनमाड | प्रतिनिधी
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त मनमाड शहरात विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तसेच शिवसेना (आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली) आयोजित कार्यक्रमांमुळे शहरात जयंतीचा उत्सवी माहोल निर्माण झाला. विविध पक्षाकडून स्मारकावर, पुष्पहार अर्पण, घोषणाबाजी, मिठाई वाटप आणि अण्णाभाऊंच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडी, मनमाड शहर शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावर रोहित संसारे व खुशाल थोरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी अण्णाभाऊंच्या साहित्यिक, सामाजिक आणि क्रांतिकारी कार्यावर प्रकाश टाकत, त्यांच्या शाहिरीने व लेखणीतून कष्टकरी, वंचित आणि शोषित समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, ज्येष्ठ नेते कैलास शिंदे गुरुजी, तुषार जाधव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. महासचिव अमोल केदारे यांनी आभार मानल्यानंतर उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आली.


दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनमाड शहर शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रवीण (पिंटूभाई) नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स येथील अण्णाभाऊ साठे स्मारकावर पुष्पहार अर्पण करण्यात आला. ज्येष्ठ शिवसैनिक रमेश हिरण, राजाभाऊ आहेर, शहरप्रमुख माधव शेलार आणि सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित गायकवाड यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर राहो", "छत्रपती शिवाजी महाराज की जय", "डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजय असो", "आवाज कोणाचा... शिवसेनेचा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानातून समाजपरिवर्तनाची मशाल पेटवली, त्यांच्या विचारांचे आजही तितकेच महत्त्व असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास उपतालुकाप्रमुख राजाभाऊ धोंडगे, तालुका सचिव शैलेश सोनवणे, नगरसेवक अमोल नरवडे, दीपक दराडे, वसंत नागरे, कचरू आव्हाड, राजाभाऊ वाघ, संजय सोळसे, प्रकाश चावरिया, विजय शिनगारे, चेतन चावरिया, जाफर मिर्झा यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

तसेच आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीनेही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष योगेश (बबलू) पाटील आणि शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी अण्णाभाऊ साठे विचार मंचचे मुरलीधर ससाणे, जिल्हाउपप्रमुख सुनील हांडगे, नगरसेवक अमीन पटेल, बब्बू कुरेशी, विशाल अहिरे, सचिन कांबळे, रोहित गायकवाड, लक्ष्मण थोरात, मजित शेख, दिनेश घुगे, दिनेश (पिंटू) पाटील, वाल्मिकी (अप्पा) आंधळे, नाना शिंदे, राजू जाधव, सागर आव्हाड, मयूर गोसावी, विलास शेळके, तसेच महिला आघाडी, युवासेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील सर्व कार्यक्रमांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.  लोकशाहीरांना अभिवादन केल्याने मनमाड शहरात सामाजिक ऐक्याचा सकारात्मक संदेशही यानिमित्ताने देण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या