Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मुक्तीभूमीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील अनधिकृत पार्किंग हटविण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

 

येवला | प्रतिनिधी
रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येवला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मुक्तीभूमी येथे पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी तसेच विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदनानुसार, येवला येथील ऐतिहासिक मुक्तीभूमी स्मारकावर गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने भीम अनुयायी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही सुविधा पूर्ववत करण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेने तात्काळ नळ कनेक्शन देऊन फिल्टर पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील परिसर "नो पार्किंग झोन" घोषित करण्यात आला असूनही तेथे अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांची गर्दी होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होत असून अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

रिपब्लिकन सेनेने संबंधित परिसरात कायमस्वरूपी लोखंडी "नो पार्किंग" फलक बसविणे, अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांकडून दंड वसूल करणे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या स्वच्छता व देखभालीसाठी नगरपरिषदेच्या वार्षिक अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेनेच्या वतीने येवला नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर प्रतीकात्मक वडापावची गाडी लावून तसेच वाहने पार्क करून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासन व शासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, जिल्हाधिकारी, येवला शहर पोलीस निरीक्षक तसेच महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी येवला युवा नेते प्रवीण संसारे, तालुका अध्यक्ष सतीश गायकवाड, स्वप्निल पगारे, प्रकाश निकाळे, नितीन गरुड, योगेश पोळ, शकील तांबोळी, पुष्कर लाठे, आदित्य गरुड यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या