Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नांदगाव विधानसभा मतदारसंघात विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम; १० ते १२ जुलैदरम्यान सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे


 नांदगाव विधानसभा मतदारसंघात विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम; १० ते १२ जुलैदरम्यान सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे

नांदगाव | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण मोहीम-२०२६ अंतर्गत ११३-नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व ३४१ मतदान केंद्रांवर १०, ११ व १२ जुलै २०२६ या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक करण्याचा उद्देश आहे.

मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना स्वस्त धान्य दुकानदार, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, पोलीस पाटील तसेच काही ठिकाणी शिक्षकांची मदत मिळत आहे. हे सर्व कर्मचारी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत.

या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या मतदार नोंदणीची पडताळणी, नाव, पत्ता, छायाचित्र, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच इतर तपशीलांची खातरजमा करून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मतदारांना इच्छेनुसार भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन गणना प्रपत्र भरता येणार असून, तसेच BLO मार्फतही प्रपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि स्वतः प्रपत्र भरू न शकणाऱ्या मतदारांसाठी BLO घरी जाऊन आवश्यक मदत करणार आहेत.

तहसीलदार तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी सुनील सौंदाणे यांनी सर्व मतदारांना या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या मतदार नोंदणीतील माहिती वेळेत तपासून आवश्यक बदल करून घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या