Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडमध्ये 'बेटी बचाव, बेटी पढाव' विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात

 

मनमाडमध्ये 'बेटी बचाव, बेटी पढाव' विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी): तालुका विधी सेवा समिती, मनमाड आणि मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे 'बेटी बचाव, बेटी पढाव' या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनमाड येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) मा. शाहिद साजिदुज्जामाँ एम. एच. हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा लोहमार्ग न्यायालय, मनमाड येथील मा. हरिष भा. परदेशी उपस्थित होते. यावेळी मनमाड वकील बार संघाचे अध्यक्ष ॲड. किशोर सोनवणे, सचिव ॲड. शशिकांत व्यवहारे, ॲड. रमेश अग्रवाल, ॲड. सुधाकर मोरे तसेच ॲड. मोहसीन शिखलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना 'बेटी बचाव, बेटी पढाव' अभियानाचे महत्त्व, मुलींच्या शिक्षणाचे सामाजिक व राष्ट्रीय महत्त्व, महिला संरक्षणासंदर्भातील विविध कायदे, महिलांचे घटनात्मक हक्क, स्त्री-सन्मान तसेच समाजातील लैंगिक समानतेची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे, संस्थेच्या संचालिका आयशा मोहम्मद सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर आणि शेख आरिफ कासम यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपशिक्षक शेख रब्बानी आशिकअली यांनी केले.

महिला सक्षमीकरण, मुलींच्या शिक्षणाचा प्रसार आणि कायद्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे विद्यार्थ्यांनी स्वागत करत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या