मालेगाव | प्रतिनिधी. गटार व झाडू कामगारांचे २८ दिवसांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मालेगाव महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. रोहिदास दोरगुळकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेने दिग्विजय इंटरप्राइजेस या ठेकेदारामार्फत गटार व झाडू कामगारांची सेवा घेतली होती. संबंधित ठेकेदाराची मुदत संपूनही कामगारांना २८ दिवसांचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने अनेक कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी अतिरिक्त आयुक्तांकडे पाठपुरावा केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. रोहिदास दोरगुळकर यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासन देताना सांगितले की, ठेक्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा केल्याशिवाय दिग्विजय इंटरप्राइजेसला कोणतीही रक्कम अदा केली जाणार नाही. तसेच कामगारांचे थकीत वेतन लवकरात लवकर देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
या आश्वासनानंतर कामगारांना लवकरच त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळेल, अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार, वरिष्ठ नेते आनंदजी आधव, शहराध्यक्ष कुणाल पिंपळे, तालुकाध्यक्ष सुनील आहिरे, एकनाथ पगारे, समाधान महिरे, सिद्धार्थ उशिरे आणि सचिन चव्हाण उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या