येवला | प्रतिनिधी "दिलेला शब्द पूर्ण करायचाच" या भूमिकेची प्रचिती देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे यांनी विठ्ठलनगर परिसरातील खराब रस्त्याची तातडीने दखल घेत अवघ्या आठवडाभरात तो रस्ता चालण्यायोग्य करून दिला. मागील मंगळवारी येथील संपर्क कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीदरम्यान डॉ. योगेश जेजुरकर आणि विशाल कळमकर यांनी विठ्ठलनगर परिसरातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था खैरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
त्यावेळी त्यांनी, "पुढच्या मंगळवारी मी तुमच्या घरी चहा प्यायला येईन; तोपर्यंत हा रस्ता चालण्यायोग्य करून देतो," असा शब्द नागरिकांना दिला होता. आज मंगळवारी येवला दौऱ्यावर असताना दिलीप अण्णा खैरे यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत श्री गणेश भावसार यांच्या घरापासून श्री अतुल गटे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर तातडीने मुरूम व खडी टाकून रस्ता नागरिकांच्या वापरासाठी चालण्यायोग्य करण्यात आला.
यावेळी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत खैरे यांच्या तत्परतेचे स्वागत केले. तसेच दिलीप अण्णा खैरे यांनी नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की, ना. छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून या परिसरात लवकरच कायमस्वरूपी काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेतले जाईल.
या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, दिलेला शब्द वेळेत पूर्ण करणारे नेतृत्व म्हणून दिलीप अण्णा खैरे यांच्या भूमिकेची परिसरात चर्चा होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या