मनमाड : मनमाड नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ मध्ये माता रमाई नगर येथे त्यागमूर्ती रमाई यांचा अर्धकृती पुतळा सुमारे 40 वर्ष जुना व लोकसहभागातून उभारण्यात आलेला असून सदर ठिकाणी परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात, सदरील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी रमाबाई नगर येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पुतळ्यालगत परिसरातील नागरिकांकडून भव्य सभामंडप उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून तसें निवेदन ,मनमाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील व मुख्याधिकारी शेषराव चौधरी बांधकाम सभापती अमित पटेल तसेच प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक, पाणीपुरवठा सभापती विशाल अहिरे व शारदा राहुल अहिरे यांच्याकडे सादर केले असून निवेदनात नमूद नुसार सभामंडपाचे बांधकाम सुरू असताना माता रमाई यांच्या पुतळ्याचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने बांधकाम सुरू करण्यापूर्वी सदरील पुतळा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.
तसेच सभामंडपाचे बांधकाम लवकरात लवकर हाती घेण्यात यावे , अशीही मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी संतोष भोसले, राजेश चव्हाण, गणेश भालेराव, गौरव गरुड, सम्यक आहिरे, अशोक संसारे, कुणाल शिंदे, राजू उबाळे यांच्यासह माता रमाई नगर परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या