"विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकत्र या; लोकशाहीचा आवाज बुलंद करा" – ॲड. सुधाकर मोरे.
मनमाड | प्रतिनिधी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मनमाड शहरातील सर्व महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा आणि न्यायाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते ॲड. सुधाकर मोरे यांनी केले आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना ॲड. मोरे यांनी सांगितले की, नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण सुरू आहे.
या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करत, ॲड. मोरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. "भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते," असे त्यांनी म्हटले. मनमाडमधील सर्व महाविद्यालयीन युवक-युवतींनी सामाजिक जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा द्यावा आणि एकजुटीने उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
"आजचा प्रश्न केवळ एका परीक्षेचा नाही, तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे तरुणांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने या आंदोलनाला पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे," असेही ॲड. सुधाकर मोरे यांनी स्पष्ट केले.संपर्क: ॲड. सुधाकर मोरे मोबाईल: ९४२२२६८६२५
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या