मनमाड | प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानाला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने मनमाड नगरपरिषद आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पखवाडा अंतर्गत मनमाड शहरात विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली.
या मोहिमेत मनमाड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे चीफ ऑफिसर आणि कंपनीचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी प्रत्यक्ष श्रमदान करून शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याचा संदेश नागरिकांना दिला.
यावेळी स्वच्छता मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने सन्मान करण्यात आला. कंपनीकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना टिफिन बॉक्स तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा, कचरा योग्य ठिकाणी टाकावा आणि स्वच्छता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना जोपासावी, असे आवाहन केले. स्वच्छता पखवाड्याच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून, प्रशासन आणि सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या उद्योगसंस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून स्वच्छ व सुंदर मनमाड घडविण्याच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या