Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

राहा लालसरे फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम; गरजवंत शेतकरी कुटुंबांच्या शेतीची मोफत पेरणी व मशागत


राहा लालसरे फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम; गरजवंत शेतकरी कुटुंबांच्या शेतीची मोफत पेरणी व मशागत


मनमाड | प्रतिनिधी
शेतकरी कुटुंबांना संकटाच्या काळात आधार देण्याच्या उद्देशाने राहा लालसरे फाउंडेशनच्या वतीने निफाड तालुक्यातील दोन गरजवंत शेतकरी कुटुंबांच्या शेतीची मोफत पेरणी आणि मशागत करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविण्यात आले.

निफाड तालुक्यातील देवगाव येथील शेतकरी कै. महेश साबळे यांचे काही वर्षांपूर्वी ट्रॅक्टर अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती सविता महेश साबळे यांनी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एकहाती सांभाळत शेती आणि संसाराचा गाडा चालविला आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राहा लालसरे फाउंडेशनच्या वतीने यंदाच्या हंगामातील शेतीची मोफत मशागत व पेरणी करून देण्यात आली.

तसेच निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी कै. सोमनाथ नागरे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी श्रीमती सोनाली सोमनाथ नागरे यांच्या शेतीचीही मोफत मशागत व पेरणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली.
या उपक्रमामुळे दोन्ही कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, स्थानिक नागरिकांनी राहा लालसरे फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी राहा लालसरे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे, देवगावचे सरपंच लहानु मेमाने, संपत नागरे, रवि शिंदे, किरण कुलकर्णी, रामनाथ शिंदे, किशोर बोचरे, दगू बोचरे, रवींद्र साबळे, सागर साबळे, संदीप लोहारकर, संतोष गव्हाणे, मच्छिंद्र आढागळे, दिलीप मेमाने, जगदीश लोहारकर, डोंगरगावचे निलेश सालकाडे, सुनील आव्हाड, दत्तू आव्हाड, कोथमिरे सर, ग्रामसेवक रणजीत निकम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या