Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

माहिती अधिकार कायद्यातील कथित दुरुस्तीविरोधात मनमाड येथे बेमुदत साखळी उपोषण.

 

मनमाड, दि. १ जुलै : माहितीचा अधिकार (RTI) कायद्यात राज्य शासनाने १२ जून २०२६ रोजी केलेल्या दुरुस्तीच्या तरतुदींच्या नावाखाली मूळ कायद्यात बेकायदेशीर बदल करण्यात आल्याचा आरोप करत, त्या दुरुस्त्या तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे हे दि. ५ जुलै २०२६ पासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार आहेत.

या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास (राळेगणसिद्धी प्रणीत) नांदगाव तालुका शाखेच्या वतीने मनमाड येथील तलाठी कार्यालयासमोर दि. ६ जुलै २०२६ पासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तहसीलदार, नांदगाव यांना दिलेल्या निवेदनात, माहिती अधिकार कायद्याची मूळ पारदर्शकता अबाधित ठेवावी, १२ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या कथित बदलांची तातडीने मागे घेण्यात यावी आणि नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अनेक वर्षे जनजागृती, आंदोलने आणि उपोषणे केली असून, त्याच परंपरेत हे आंदोलन करण्यात येत आहे. मनमाड येथील साखळी उपोषणास मनमाड शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या नांदगाव तालुका शाखेतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या