मनमाडमध्ये माणुसकीचा आदर्श! विसरलेले पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे केले परत
२५ हजार रुपयांचे पाकीट सुरक्षित ठेवून ज्येष्ठ नागरिकाला दिला दिलासा
मनमाड : शहरातील बाजारपेठेत माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देणारी घटना समोर आली आहे. मुंबई येथील रहिवासी असलेले गुलाम कुरैशी हे काही कामानिमित्त मनमाड येथे आले होते. ते सचिन लॉज येथे मुक्कामी थांबले होते.
कामानिमित्त ते बाजारपेठेत आले असताना वय जास्त असल्याने त्यांना परत लॉजचा पत्ता शोधताना अडचण येत होती. यावेळी ते गणेश कोठावदे यांच्या दुकानाजवळ थांबले आणि त्यांनी लॉजचा पत्ता विचारला. दरम्यान, त्यांना तहान लागल्याने त्यांनी पाण्याची बाटली कुठे मिळेल, अशी विचारणा केली. गणेश कोठावदे यांनी समोरच पाण्याच्या बाटलीचे दुकान असल्याचे सांगितले.
याच दरम्यान गुलाम कुरेशी यांनी पैसे काढताना आपले पैशांचे पाकीट गणेश कोठावदे यांच्या दुकानातच विसरले. त्यानंतर ते लॉजवर गेले. काही वेळाने त्यांना पाकीट हरवल्याचे लक्षात आले. रात्री त्यांनी पुन्हा गणेश कोठावदे यांच्याशी संपर्क साधून पाकिटाबाबत विचारणा केली.
यावेळी गणेश कोठावदे यांनी त्यांना धीर देत सांगितले की, "तुम्ही काळजी करू नका, तुमचे पाकीट माझ्याकडे सुरक्षित आहे." त्यांनी तत्काळ ते पाकीट गुलाम कुरेशी यांच्या स्वाधीन केले. या पाकिटात सुमारे २० ते २५ हजार रुपयांची रक्कम होती.
आपले पैसे परत मिळाल्यानंतर गुलाम कुरेशी यांनी गणेश कोठावदे यांचे आभार मानत सांगितले की, "आजच्या काळातही अशी माणुसकी जिवंत आहे, याचा मला आनंद आहे."
गणेश कोठावदे यांच्या प्रामाणिकपणामुळे मनमाड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या या कृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
"पैशांपेक्षा मोठी असते माणुसकी... आणि मनमाडने पुन्हा एकदा ती दाखवून दिली!"
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या