Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन; आंदोलनानंतर प्रशासनाकडून लेखी पत्र




मनमाड: - मनमाड नगरपरिषद हद्दीतील 'आय.यु.डी.पी.' (IUDP) साईट क्र. १८ येथील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी 'सार्वजनिक गार्डन' म्हणून राखून ठेवण्याऐवजी, ती जागा वैयक्तिक भाडेकराराने देण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. २४ /०६/२०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

मनमाड नगरपरिषदेने १० एप्रिल २०२६ रोजी घेतलेल्या सभा ठराव क्र. १० नुसार, ही मोक्याची जागा खाजगी वापरासाठी भाडेकराराने देण्याचा घाट घातला आहे. या जागेवर आता खाजगी 'टर्फ'चे कामही सुरू झाले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीने याआधी १३ मे २०२६ रोजी निवेदनाद्वारे ही जागा सार्वजनिक वापरासाठीच ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने अखेर आज आंदोलन पुकारण्यात आले होते.

प्रशासनाचे लेखी पत्र 
आंदोलनाची तीव्रता पाहून अखेर मनमाड नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली. आंदोलक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून,  लेखी पत्र दिल्यानंतर, हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष विलास अहिरे व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही हे आंदोलन केवळ तात्पुरते स्थगित केले आहे. जर प्रशासनाने हा बेकायदेशीर ठराव त्वरित रद्द केला नाही, तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल."

या धरणे आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष विलास अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे आणि जिल्हा सचिव कादिर शेख यांनी केले. तसेच जिल्हा नेते दिपक साळवे (साळवे बाबा), संदीप पवार, निलेश निकम, सागर गाढे, राकेश पगारे, अमोल केदारे, अशफाक शहा, काकासाहेब भालेराव, खुशाल थोरात, सुनील बागुल.किरण पगारे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या