मनमाड : फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हजरत मोहम्मद पैगंबर साहेब व माँ बीबी आयशा यांच्याबद्दल आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या नाजिया इलाही खान याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत मनमाड शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित व्हिडिओमधून धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करण्यात आले असून यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या आहेत. समाजात तेढ निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मगणी करण्यात आली आहे.
भारत हा विविधतेत एकता असलेला देश असून संविधान प्रत्येक धर्माच्या श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक भावनांचा आदर करण्याचा संदेश देते. कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांबाबत अपमानास्पद वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी तक्रारदारांनी संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटविण्याची तसेच दोषींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत योग्य ती कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
मनमाड शहर पोलीस प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या