मनमाड | दिनांक २६ जून २०२६: मनमाड शहरात आज 'यौम-ए-आशूरा' निमित्त कैम्प अयोध्या नगर येथील इमामबाडा येथून 'मातम-ए-हुसैन' जुलूस अत्यंत शांततेत आणि श्रद्धेने काढण्यात आला. अहले-अज़ादार-मनमाड तर्फे आयोजित या जुलूसमध्ये शेकडो मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवून हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या ७२ साथीदारांच्या शहादत बलिदानाचे स्मरण केले या हुसैन या हुसैन च्या घोषणानीं संपूर्ण परिसर दनानून गेले होते.
इस्लामी कॅलेंडरमधील मोहर्रम हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्याचा १० वा दिवस म्हणजे 'यौम-ए-आशूरा'. सुमारे १४०० वर्षांपूर्वी कर्बलाच्या मैदानात हजरत इमाम हुसैन (पैगंबर मुहम्मद यांचे नातू) यांनी अन्यायाविरुद्ध आणि सत्यासाठी आपले प्राण अर्पण केले होते. हा दिवस जुलूम आणि अत्याचाराविरुद्ध लढण्याचे, संयम पाळण्याचे आणि माणुसकी टिकवून ठेवण्याचे प्रतीक म्हणून जगभरात पाळला जातो.
या वेळी ईमाम बाडा अहले-अज़ादार-मनमाड तर्फे सांगण्यात आले की.
यौम-ए-आशूरा'. दिवशी आल-ए-मुहम्मद ﷺ (अहेले बैत) त्यांचे वंशजाचे चे रक्त कर्बलामध्ये वाहण्यात आले आहे.
कर्बलाची लढाई ही एक अशी लढाई आहे ज्यात वाहिलेले रक्त इस्लामच्या शिरामध्ये कायमचे प्रवेश करुन गेले आहे आल-ए-मुहम्मद ﷺ चे रक्त रेगिस्तानात वाहुन मिटले नाही तर ते मुस्लिमांच्या शिरात वाहत आहे.
गम-ए-हुसैन हेच आहे, आशुरा हे कोणत्याही विशिष्ट वेळेचे नाव नाही, आशुरा हा तो दिवस आहे जो १४०० वर्षांपासून प्रत्येक दिवसावर जड आहे, ज्यांच्यासाठी अल्लाह सर्वशक्तिमानाने हे जग निर्माण केले आहे त्या प्रेषित मुहम्मद ﷺ नातवाचे दु:ख केवळ एका दिवसापुरते मर्यादित नाही.
आशुरा हा दिवस एक घोषणा,एक कबुलीजबाब, एक गवाही आहे की आम्ही साक्ष देतो की इमाम हुसैन (रजि.) मासूम आणि निर्दोष होते आम्ही साक्ष देतो की इमाम हुसेनवर अत्याचार झाले होते, आम्ही साक्ष देतो की इमाम हुसैन हक्कावर होते
जब भी ज़मीर-ओ-ज़र्फ़ का सौदा हो दोस्तो क़ाएम रहो हुसैन के इंकार की तरह....
जुलूस दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
पोलिसांच्या सहकार्यामुळे आणि दक्षतेमुळे हा धार्मिक कार्यक्रम कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. याबद्दल इमामबाडा कमिटी आणि अहले-अज़ादार- मनमाड तर्फे मनमाड पोलीस विभागाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या