मनमाडमध्ये 'वंचित'च्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा
मनमाड: (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजन हृदयसम्राट आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त, वंचित बहुजन आघाडी मनमाड शहराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजकीय उत्सवापेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत, मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.
आदरणीय ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे यांचे वाढदिवसानिमित्त उद्या 11 मे रोजी गोरगरीब गरजूंना छत्र्या वाटप करण्यात येणार असून. तसेच पुस्तके देखील वाटप करण्यात येणार आहे.
"साहेबांच्या विचारांचा वारसा हा केवळ भाषणांतून नाही, तर सेवेच्या माध्यमातून पुढे नेणे हीच खरी त्यांना वाढदिवसाची भेट आहे," अशी भावना यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीचे पदाधिकारी, मनमाड शहर कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयातील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, साहेबांना उदंड आयुष्य लाभो, अशी सदिच्छा यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या