Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

तेजस्वी ज्ञानसूर्याला अभिवादन — डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष लेख

 

मला -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुंदर एक वाक्य आठवते फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धिला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आपल्या नेत्रदिपक कार्यकर्तुत्वामुळे ज्या विद्वानाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेले व संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचे स्थान अग्रस्थानी आहे अशा -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस १४ एप्रिल रोजी संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आपल्या प्रखर वाणी व धारदार लेखणीतून ज्यांनी बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळावा, प्रत्येकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळावे, यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी खर्ची घातले त्या ज्ञान सूर्याचा आज जन्मदिवस. भारतीय संविधानाची निर्मिती करून या देशातील लोकांच्या जीवनात असलेल्या अंधाराला प्रकाशाकडे नेण्याचे कार्य -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ज्या महान व्यक्तीने आयुष्यभर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून जनसामान्यांचे जीवन कसे प्रकाशमय होतील याकरिता प्रयत्न केले. भारतातील सर्व स्त्रियांवर -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फार उपकार आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी केवळ मागासवर्गीय स्त्रियांसाठीच कार्य केले असे नाही ,तर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला समता ,स्वतंत्र बहाल केले. आंबेडकरांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन उदार आणि मानवतावादी होता. स्त्रियांना सुद्धा आर्थिक स्वातंत्र मिळाले पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी पुरस्कार केला. ते म्हणायचे जोपर्यंत स्त्रियांना संपत्तीत वारसा हक्क मिळत नाही, तोपर्यंत गुलामगिरी संपणार नाही. त्यांनी स्त्रियांच्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक उपाययोजना करून दिल्या, जसे सरकारी नोकरीतील स्त्रियांना प्रसूती रजा हे त्याचे उदाहरण होय. स्त्री व पुरुष ही संसाररूपी रथाची दोन चाके आहेत. त्यामधील एक चाक जर मागे राहिले तर संसाराचा रथ हा व्यवस्थित चालू शकणार नाही म्हणून पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जागृत झाले पाहिजे अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. स्त्रिया सुद्धा स्वकर्तृत्वावर सत्ताधिकारी बनू शकते. देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये आपला सहभाग नोंदवू शकते. यासाठी आंबेडकरांनी राजकीय आरक्षणाची तरतूद केली. -डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सर्वप्रथम घटना परिषदेमध्ये आपण दलित ,शोषित, पीडित, आदिवासी जनतेच्या हक्कासाठी गेलो पाहिजे. अशी भूमिका -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती. घटना परिषदेमध्ये -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश होऊच नये यासाठी विरोधकांकडून आटोकाट प्रयत्न केल्या गेले. तरीसुद्धा पश्चिम बंगालमधील जोगेंद्र मंडल यांच्या सहकार्यामुळे ते घटना समितीवर निवडून आले. त्यानंतर भारताच्या राज्यघटना निर्मितीची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. आणि ते मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून गेले. धर्म ही बाब आपल्या देशामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. याची त्यांना जाणीव होती. यासाठीच त्यांनी राज्यघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मपालनाचा, आपल्या देव देवतांवर विश्वास ठेवण्याचा, त्यांचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार राखून ठेवला. प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य दिल्या गेले. फक्त हे स्वातंत्र्य कायदा व सुव्यवस्था ,नीतिमत्ता आणि स्वास्थ यांच्या संदर्भात केलेल्या कल्पनांशी सुसंगत असावे अशी त्यांची धारणा होती. संविधानानुसार भारतीय नागरिकांना सात प्रकारचे मूलभूत हक्क दिले गेले. त्यामध्ये भाषण करणे, विचार व्यक्त करण्याचे स्वतंत्र, संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, शांततापूर्व एकत्र येण्याचे स्वतंत्र्य ,भारतात कोठेही संचार करण्याचे स्वतंत्र ,व्यापार करण्याचे स्वातंत्र्य, संपत्ती मिळवण्याचे स्वातंत्र्य अशा अनेक प्रकारचे स्वातंत्र्य दिल्या गेले. भारतीय संविधानाने भारतातील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानले. देशातील प्रत्येक व्यक्तीला आपला सभ्य आणि सुरक्षित जीवन जगता यावा यासाठी संविधानात काही मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा समावेश करण्यात आला. त्यामध्ये आर्थिक, सामाजिक व राजकीय मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला. भारतामध्ये जर खऱ्या अर्थाने सामाजिक, आर्थिक ,राजकीय न्याय व समता प्रस्थापित करायची असेल तर या मार्गदर्शक तत्वांचा काटेकोरपणे वापर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे -डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. याचा उल्लेख ही त्यांनी राज्यघटनेमध्ये कटाक्षाने केलेला आढळून येतो.

भारत हा मोठा असा खंडप्राय देश आहे. या देशातील प्रत्येकाला माणूसपण देण्याचे काम संविधानाने दिले आहे. आज स्वातंत्र्यानंतर एवढी वर्षे लोटल्यानंतरही भारताची एकता, अखंडता अबाधित असून जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला यशस्वी देश म्हणून भारताकडे पाहिला जाते. याचे सर्व श्रेय -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला जाते. -डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान लेखक, पत्रकार, संपादक असे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व होते. समाजातील अनिष्ट रूढींना वाचा फोडण्यासाठी त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यासारखे पाक्षिक सुरू केले, यामधून ते आपले विचार समाजासमोर मांडू लागले. महाडचा चवदार पाण्याचा सत्याग्रह म्हणजे -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसाला दिलेली जीवनातील सर्वात मोठी नवसंजीवनी होती. -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अनेक घटनांमधून त्यांच्यातील राष्ट्रवादी नेता आणि महान असा विचारवंत आपणास पहावयास मिळतो. -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक समतेचा व खऱ्या स्वातंत्र्याचा लढा आयुष्याच्या शेवटपर्यंत चालूच होता. देशातील प्रत्येक माणूस खऱ्या अर्थाने सुखी व्हावा यासाठी ते प्रत्येक चळवळीमध्ये सहभागी होत होते. आपल्या कोट्यावधी अनुयायांना सामाजिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी एक ध्येयवेडा महापुरुष नेहमीच झगडत होता. आज ही जेव्हा अन्न, वस्त्र ,निवारा या भौतिक गरजा पूर्ण होत नाहीत. चांगले शिक्षण, रोजगार, आरोग्य मिळत नाही. त्यावेळेस -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दूरदृष्टी असलेले विचार किती महत्त्वाचे होते याची जाणीव होते तसेच -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जागतिक ख्याती जगातल्या शंभर विद्वानांच्या यादीमध्ये अव्वल क्रमांकाचा एकमेव विद्वान अवघ्या जगभरातल्या सहा विद्वानांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिकेने घोषित केले की, १४ एप्रिल हा दिवस जागतिक 'शिक्षक दिन' म्हणून पाळला जावा. कारण त्या दिवशी जगत विख्यात ज्ञानसूर्य -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला कोलंबिया विद्यापीठातील सर्वात हुशार विद्यार्थी जगात सर्वाधिक पुतळे असणारा एकमेव महामानव विश्वरत्न -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आपण पाहिले तर एका आकडेवारी नुसार संयुक्त राष्ट्र अमेरिकेत ६८ , जपान ४९ , चीन ४७ , श्रीलंका ४० , रशिया ३० , थायलंड २५ , लंडन ५५ , कॅनडा ४० , महाराष्ट्र ( भारत ) ३०७०० , कर्नाटक ( भारत ) ३००५८ , उत्तरप्रदेश ( भारत ) ११४४० , बिहार ( भारत ) ९५०० , आंध्रप्रदेश ( भारत ) ७८६० , राजस्थान ( भारत ) ५५०० , मध्ये प्रदेश ( भारत ) ६३०० , गोवा ( भारत ) ४५६७ , ज्ञानसूर्य विश्वरत्न -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकूण पुतळ्यांची आकडेवारी पाहिली तर १०६,२७९ असून विश्वरत्न -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे केवळ भारतातच नाही, तर जगभरात सामाजिक स्वातंत्र, समता, बंधुता, ज्ञान आणि मानवी

हक्कांचे प्रतीक म्हणून विराजमान आहेत. हे आपल्याला कटकशाने दिसून येते. एक हजार भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धीमान अर्थशास्त्रामध्ये पीएच.डी. मिळविणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळविणारे प्रथम दक्षिण आशियायी अर्थतज्ञ यादीमधील डी. एस्सी. ही दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळविणारे प्रथम भारतीय लंडन विद्यापीठामध्ये आठ वर्षे कालावधी लागणारा अभ्यासक्रम केवळ २ वर्षे ३ महिन्यामध्ये यशस्वीरीत्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव क्रांतिकारी सत्याग्रही महामानव -डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दिसून येतील पुस्तकासाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी बॅरिस्टर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकातून पाहिला मिळतील. तरी तब्बल ५५ पुस्तके आणि अनेक ग्रंथाचा लेखक विसाव्या शतकातील जगातील सर्वात बुद्धीमान कायदेपंडित घटनातज्ञ पाच हजार वर्षांचा इतिहास केवळ चाळीस वर्षात बदलणारा एक थोर युगपुरुष --डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या समतावादी कार्यातून दिसून येतील. एका पेक्षा एक अशा तब्बल ३२ पदव्या मिळविणारा एकमेव भारतीय. लंडनच्या संसदेमध्ये ज्याची जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता लंडनच्या म्युझियममध्ये कार्ल मार्क्स सोबत ज्याची प्रतिमा आहे असा एकमेव भारतीय. महान चक्रवर्ती सम्राट अशोक नंतर शांती आणि अहिंसामय अशी दुसरी धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धाला नव्याने भेटतांना आणि धम्माला पुन्हा गतिमान करताना या भारत देशामध्ये धम्मक्रांतीला गतिमान करणारा एकमेव महामानव दिसून येतो. 

ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणात दहा हजार वर्षांमधीत १०० विश्वपुरुषांच्या यादीमधला हा चवथा विश्वरत्न -डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर घडवून आणणारा महान बौद्ध पुनरुत्थानी तेव्हा, केवळ तीन दिवसांमध्ये साडे आठ लाख, लोकांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, घटनाशास्त्र, व्यापार, लेखन, समाजप्रवर्तन, साहित्य इत्यादी ज्ञानक्षेत्रातील विविध विषयावर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ती. जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय असणारा सर्वात थोर विद्याव्यासंगी. इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात सर्वोच्च दहा भारतीयांमध्ये अव्वल क्रमांक पटकाविणारा सर्वात महान भारतीय पाहिला मिळतो पुढे माझी एक कविता आपल्या पुढे मांडावी वाटते शिर्षक - बा भिमा. 


बा भिमा काय सांगू मी 
तू मला इतके दिले 
या जगण्याला नवा जन्म 
देवून मला माणूस केले....!
तुझे इतके अनंत उपकार 
माझ्या पिढ्यान पिढ्यांवर आहे 
कसं सांगू मी माझ्या श्वासावर 
तुझेच देणं आहे....!
आज जे निवांत मी 
घरी पाण्याचा घोट पीत आहे 
त्या पाण्याच्या घोटावर 
पण तुझेच हक्क आहे.....!
आज तू नसतास तर 
लादलीगेली असती पुन्हा गुलामगिरी 
सावलीचा विटाळ कमरेला झाडू 
फिरावे लागले असते गावोगावी....!
पण बा भिमा तुझे नाव अभिमानाने 
प्रकाश ला घ्यावेसे वाटते 
त्याचं माझं आमच्या सर्वांचं आयुष्य बदलणारा 
तू जग बदलणारा बाप माणूस आहे....!


भारतीय राज्यघटनेचे थोर एकमेव शिल्पकार विश्वरत्न ज्ञानसूर्य -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीदिनी अशा या महान नेत्यास कोटी कोटी प्रणाम..!  
लेखक, कविराज, प्रकाश संगिता नंदकुमार निकाळे 
( क्रांतिभूमी विंचूर ) ८३८०८२४३८५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या