मनमाड : मनमाड नगरपरिषदेकडून सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे शहरातील सुमारे 600 लहान व्यावसायिक व हातमजुरांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सन 1990 पूर्वी महामार्गावरील अतिक्रमण हटविताना त्या व्यावसायिकांना पर्यायी जागा म्हणून महालक्ष्मी चौक ते पाकिजा कॉर्नर येथील शासकीय धान्य गोदामाच्या भिंतीलगत जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून हे व्यावसायिक त्या ठिकाणी छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

मात्र नगरपालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक दोन दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईमुळे सुमारे 4 हजार नागरिकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पावसाळ्यात शासकीय अथवा खासगी जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई टाळावी, असे आदेश असतानाही ही कारवाई सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही अतिक्रमणधारक हे नगरपालिकेचे नियमित करदाते असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आरपीआय (आठवले) पक्षाने मागणी केली आहे की, पाकिजा कॉर्नर येथील सुलभ शौचालयालगत असलेल्या मोकळ्या जागेत व्यावसायिक गाळे उभारून संबंधित अतिक्रमणधारकांना प्राधान्याने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांचा पारंपरिक व्यवसाय व कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू राहू शकेल.

अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर राजेंद्र अहिरे,गंगा दादा त्रिभुवन रुपेश आहिरे युवक ग्रा. जिल्हाध्यक्ष कैलासभाऊ आहिरे रिपाइं नांदगाव तालुकाध्यक्ष पी.आर.निळे उत्तर महाराष्ट्र संघटक
दिलीप नरवडे मनमाड शहर अध्यक्ष सुरेश शिंदे रिपाइं नेते रुपेश आहिरे युवा जिल्हाध्यक्ष कैलासभाऊ आहिरे नांदगाव तालुका अध्यक्ष सुरेशाई शिंदे रिपाइं नेते संजय भालेराव युवा ता. अध्यक्ष प्रमोद जगताप रिपाइं युवा शहर अध्यक्ष सुशिल खरे रिपाइं नेते मोजेस साळवे रिपाइं नेते हरिभजन चावरिया (जिल्हा संघटक) बबलु लहारे दिनकर कांबळे सुरेश जगताप धनराज वाहूळकर सुरेंद्र आहिरे शिरीष पगारे अशोक आहिरे (मुंगा) रामभाऊ जैसवाल दिपंकर त्रिभुवन प्रदिप घुसळे बाळासाहेब भोसले नाना आहिरे अकिल शेख अशोक लहिरे चांगदेव संसारे दिपक आहिरे सचिन पगारे गौरव निकम पापा शहा रुख्मिणीताई आहिरे (महिला शहर अध्यक्षा) कमलताई खरात (शहर संघटक) बबनबाई वाघ पुष्पा गायकवाड मंगलाताई सोनवणे कुसूमताई दहिवलेताई (शहर संघटक) मिनाताई गांगुर्डेयांच्यातर्फे निवेदन देण्यात आला आहे.