Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आयुष्य वेचणाऱ्या लढवय्या नेतृत्वाचा वाढदिवस उत्साहात

 

मनमाड | प्रतिनिधी
मनमाड शहरासह राज्यभरातील असंघटित कामगार, फेरीवाले, हमाल, कुली, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक व साप्ताहिक सत्ता परिवर्तन चे संपादक बळवंतराव जी आव्हाड यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा होत आहे.

असंघटित कामगारांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मनमाड शहरातील असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्याच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला. विशेष म्हणजे संपूर्ण देशातील रेल्वे स्थानकांवरील कुली बांधवांना संघटित करून त्यांना रेल्वे व्यवस्थेमध्ये योग्य स्थान मिळावे यासाठी त्यांनी उभारलेला लढा राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला.

असंघटित क्षेत्रातील कामगार आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, त्यांच्या कष्टाला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी त्यांनी बाजारपेठेमध्ये विश्वासार्ह पत निर्माण करत कामगारांसाठी पतसंस्थेची स्थापना केली. याशिवाय असंघटित फेरीवाला संघटनेच्या माध्यमातून हजारो फेरीवाल्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

समाजसेवा आणि कामगार चळवळीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना "गुणवंत कामगार पुरस्कार" प्रदान करून गौरविले आहे. व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना "महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार" मिळाला आहे. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा "समाजभूषण पुरस्कार" देखील त्यांना प्रदान करण्यात आला.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांचा आवाज बुलंद करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. साप्ताहिक सत्ता परिवर्तन च्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कामगार, पत्रकारिता आणि जनकल्याणाच्या विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्याबद्दल सर्व स्तरांत आदराची भावना आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संस्था, कामगार संघटना, पत्रकार, राजकीय पदाधिकारी, व्यापारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे, कामगारांच्या हक्कासाठी लढणारे आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य समर्पित करणारे हे नेतृत्व आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहे. त्यांचे कार्य असेच अखंडपणे सुरू राहो आणि समाजहिताचे त्यांचे ध्येय अधिक व्यापक स्वरूपात यशस्वी होवो, अशा भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या