मनमाड (प्रतिनिधी): पवित्र रमजान ईद निमित्त नमाज पठणासाठी मनमाड शहरातील आय.यु.डी.पी. परिसरातील नवीन ईदगाह मैदानाची विशेष स्वच्छता मोहीम मनमाड नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आली. मुख्याधिकारी शेषराव चौधरी, नगराध्यक्ष योगेश पाटील, आरोग्य सभापती सौ. पूजा साबळे तसेच आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे पार पडली.
ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरणात नमाज अदा करता यावी, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले. जेसीबी व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने मैदानातील कचरा, गवत व इतर अडथळे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील, लोकेश साबळे, सुनिल हांडगे, धनंजय आंधळे, मुस्ताक कुरैशी, नगरसेवक गटनेते महेंद्र सिरसाठ, रफीक शेख यांनी विविध ठिकाणी भेट देत स्वच्छता कामांचा आढावा घेतला. तसेच गॅरेज विभागाचे सतीश चावरिया, दीपक धिवर, जेसीबी चालक सुनील बागुल, प्रदीप धिंगाण, शशी धिंगाण यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
या स्वच्छता उपक्रमाबाबत प्रशासन आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून, ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छतेचा आदर्श निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या