Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

४ वर्षांच्या अलिशा जिलानी शेख हिने पूर्ण केला आयुष्याचा पहिला रोजा; समाजात कौतुकाचा वर्षाव



मनमाड : रमजान महिन्यात उपवासाला (रोजा) विशेष धार्मिक महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात मोठ्यांसोबत लहान मुलांमध्येही धार्मिक भावना आणि उत्साह पाहायला मिळतो. मनमाड शहरातील अवघ्या ४ वर्षांच्या अलिशा जिलानी शेख या चिमुकलीने आपला आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

इतक्या लहान वयात पूर्ण दिवस संयम ठेवत रोजा पाळणे हे खरोखरच कौतुकास्पद मानले जात आहे. अलिशाच्या निर्धाराचे कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांकडूनही मोठे कौतुक होत आहे. तिच्या या छोट्या पण प्रेरणादायी कृतीमुळे समाजात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रमजान महिन्यात रोजा ठेवणे म्हणजे केवळ उपवास नव्हे तर संयम, शिस्त आणि अल्लाहप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा मार्ग आहे. अलिशा जिलानी शेख हिने इतक्या लहान वयात ही भावना समजून घेत रोजा पूर्ण केल्याने अनेकांनी तिचे अभिनंदन करत तिला आशीर्वाद दिले.

परिसरातील नागरिकांनी सांगितले की, “आजच्या काळात लहान मुलांमध्येही धार्मिक संस्कार जपले जात आहेत, हे पाहून खूप आनंद वाटतो. आयशाने पूर्ण केलेला पहिला रोजा इतर मुलांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.”

अलिशाच्या कार्यामुळे तिच्या कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, समाजमाध्यमांवरही तिच्या या छोट्या पण मोठ्या कामाची चर्चा सुरू झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या