मनमाड | प्रतिनिधी : मनमाड शहरातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने करंजवण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना आता गती मिळाली असून, शहरातील विविध भागांमध्ये नवीन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आमदार मा. सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.
डमरे प्लॉट आणि बोहरी कॉलनी या भागांमध्ये नुकतीच नवीन पाईपलाईन टाकण्यात आली असून, त्यावर नळ कनेक्शन देणे व पाईपलाईन टेस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आज नगराध्यक्ष . योगेश पाटील यांच्या उपस्थितीत या भागात नवीन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी नागरिकांनी पूर्ण दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार सुहास अण्णा कांदे, सौ. अंजुमताई कांदे, फरानदादा खान तसेच नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी परिसरात फेरफटका मारत नागरिकांशी संवाद साधला. नवीन पाईपलाईनवर घेतलेले नळ कनेक्शन योग्य पद्धतीने घरात बसवावेत, त्यावर तोट्या लावाव्यात तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन त्यांनी केले. मनमाड नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केले जात असून, नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते लोकेश साबळे, सचिन दरगुडे, करंजवण योजनेचे विभाग प्रमुख मुक्तार शेख, वाल्मन योगेश सांगळे, असिफ सय्यद आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या