आय.यु.डी.पी. परिसरात मातृशक्तीची बैठक उत्साहात; गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा व विराट हिंदू संमेलनाचा निर्धार
मनमाड प्रतिनिधी :
मनमाड येथील आय.यु.डी.पी. परिसरातील मातृशक्तीची बैठक कमलाक्ष गणपती मंदिर येथे उत्साही वातावरणात पार पडली. आगामी गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागतानिमित्त भव्य शोभायात्रा तसेच विराट हिंदू संमेलन अभूतपूर्व उत्साहात साजरे करण्याचा ठाम निर्धार या बैठकीत महिलांनी व्यक्त केला.
या बैठकीस ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्त्या सायली पेंडसे यांनी मार्गदर्शन केले. आय.यु.डी.पी. परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनाच्या तयारीसाठी ही चौथी बैठक असल्याचे सांगण्यात आले. परिसरातील महिलांनी बैठकीचे नियोजन अत्यंत चोख केले असून त्यांचा सहभागही मोठ्या उत्साहाने दिसून आला.
यावेळी सायली पेंडसे तसेच केतन देवरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हिंदू संस्कृतीचे महत्त्व, हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची परंपरा आणि आगामी विराट हिंदू संमेलनाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक सजावट, रांगोळी, तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
या बैठकीमुळे परिसरातील महिलांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत प्रत्येक घरातून सक्रिय सहभाग नोंदवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील नागरिक विशेष परिश्रम घेत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या