मनमाड प्रतिनिधी : मनमाड नगर परिषद कडून घरपट्टी, पाणीपट्टी तसेच गाळा भाडे थकबाकी वसुलीसाठी कडक पावले उचलण्यात येत आहेत. वरिष्ठ कार्यालयांकडून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने अंतिम टप्प्यातील कारवाई सुरू केली आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र नोटीस मिळाल्यानंतरही अनेक थकबाकीदारांनी अद्याप कर भरणा केलेला नसल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
यामुळे अशा थकबाकीदारांची नावे व थकबाकीची माहिती जाहीरपणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय नगरपरिषदेकडून घेण्यात आला असून, लवकरच ही यादी सार्वजनिक करण्यात येणार आहे.
याबाबत नागरिकांना आवाहन करताना शेषराव चौधरी (मुख्याधिकारी, मनमाड नगरपरिषद) यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांनी आपल्या घरपट्टी, पाणीपट्टी तसेच गाळा भाड्याची थकबाकी तातडीने नगरपरिषद कार्यालयात जमा करावी. अन्यथा पुढील कठोर प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहराच्या विकासकामांसाठी कर वसुली अत्यंत महत्त्वाची असल्याने थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरून कोणताही कटू प्रसंग टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या