मनमाड | प्रतिनिधी मनमाड नगर परिषद यांच्या नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीची बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ही बैठक नगरपरिषदेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती.
नगरपरिषदेत एकूण 33 सदस्यांची संख्या असून दोन नगरसेवक पदांच्या जागा अधिकृत आहेत. नियमानुसार नगरपरिषदेसाठी तीन नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करता येते. मागील बैठकीत शिंदे सेनेचे शहराध्यक्ष मयूर बोरसे यांची नामनिर्देशित सदस्यपदी निवड करण्यात आली होती, तर उर्वरित दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या.
गुरुवार 12 मार्च रोजी झालेल्या बैठकीत या दोन रिक्त जागांसाठी शिंदे सेनेच्या नेत्या संगीता बागुल आणि दिनेश घुगे यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी भूषविले. तसेच व्यासपीठावर मुख्याधिकारी शेषराव चौधरी उपस्थित होते.
सध्या 31 नगरसेवक असलेल्या नगरपरिषदेत सत्ताधारी महायुतीकडे 25 सदस्यांचे स्पष्ट बहुमत असून विरोधी आघाडीकडे 6 नगरसेवक आहेत. त्यामुळे तीनही नामनिर्देशित सदस्य हे सत्ताधारी शिंदे सेना-भाजपा महायुतीचे असतील, हे जवळपास निश्चित मानले जात होते.
या आधीच मयूर बोरसे यांची निवड झाल्यानंतर उर्वरित दोन जागांसाठी झालेल्या बैठकीत संगीता बागुल व दिनेश घुगे यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून नव्या सदस्यांचे अभिनंदन करत त्यांचे स्वागत केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या