Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड : जागतिक महिला दिनानिमित्त कारखान्यातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार


 मनमाड : जागतिक महिला दिनानिमित्त कारखान्यातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

मनमाड प्रतिनिधी : जागतिक महिला दिन तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून नॅशनल रेल्वे मजदुर युनियन, कारखाना शाखा मनमाड तर्फे कारखान्यात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाचा संदेश देत महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मनमाड येथील सुप्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटलच्या डॉ. स्वाती देवरे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेच्या महिला अध्यक्षा योगिता कांगणे यांनी केले, तर निता महाले यांनी अनुबोधन केले.

यावेळी डॉ. स्वाती देवरे यांनी महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य, कुटुंब आणि कामाचा समतोल राखण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सहायक कारखाना प्रबंधक राम नारायण राम व शाखेचे सचिव कॉम्रेड रमेश केदारे यांनीही महिलांच्या योगदानाचे कौतुक करत मार्गदर्शनपर भाषण केले.

कार्यक्रमाचे आयोजन कॉम्रेड मनोज गाजरे, रवि चौधरी, साईनाथ लांडगे, योगेश गडवे आणि बाळासाहेब पवार यांनी केले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांना डॉ. स्वाती देवरे तसेच सहायक कारखाना प्रबंधक यांच्या हस्ते नॅशनल रेल्वे मजदुर युनियन तर्फे भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास सिनियर सेक्शन इंजिनिअर धनंजय घोडके, चीफ ओ.एस. चंद्रमणी बाबुजी, अशफाक खान, गौतम गांगुर्डे, चंदन कुमार, शेख राहिल आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच महिला कर्मचाऱ्यांची उपस्थितीही लक्षणीय होती.कार्यक्रमाच्या शेवटी कॉम्रेड संतोष सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या