मनमाड प्रतिनिधी : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड येथील राज्यशास्त्र व मराठी विभागातील विद्यार्थी व शिक्षकांनी मनमाड नगरपरिषदेला शैक्षणिक भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभाग, वसुली विभाग, आरोग्य विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, सभा विभाग तसेच आस्थापना विभाग अशा विविध विभागांना भेट देऊन संबंधित विभाग प्रमुखांकडून कामकाजाची माहिती जाणून घेतली. विविध शासकीय प्रक्रियांबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनमाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांचीही भेट घेतली. शहरातील विकासकामे, नगरपरिषदेचे प्रशासन व विविध योजनांबाबत विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.
नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितले की, मनमाड शहरात सध्या विविध विकासकामे सुरू असून आमदार सुहास कांदे व अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच फरान खान यांच्या नेतृत्वात शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे काम सुरू आहे. शहरात स्टेडियम, जलतरण तलाव, विविध मंदिरांचे सभामंडप, समाजासाठी सभागृहे तसेच अत्यंत महत्त्वाची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे जात आहे. याशिवाय भुयारी गटार योजनेचे कामही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच शहरात विविध उद्याने विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला असून नमो उद्यान योजनेच्या माध्यमातून मोठे उद्यान उभारण्याची योजना आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचाही मानस असून त्यामुळे पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन, खत प्रकल्प व पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या विजेचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून शहरातील अनेक पुलांची उंची वाढविण्यात आल्याने भविष्यात मुसळधार पावसातही वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. तसेच शहरात आवश्यक त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ते व इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना नगराध्यक्षांनी समाधानकारक उत्तरे दिली.
या प्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज महाविद्यालयाचे सुमारे ४० विद्यार्थी उपस्थित होते. राज्यशास्त्र विभागाचे प्रा. एस. पी. नवले, प्रा. निलेश जाधव, प्रा. नितीन गवळी तसेच मराठी विभागाच्या काकळीच मॅडम, प्रा. विजय पांगुळ यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. तसेच मनमाड नगरपरिषदेचे शिवसेना गटनेते महेंद्र शिरसाठ, नगरसेवक अमजद पठाण हेही उपस्थित होते. शेवटी महाविद्यालयाच्या शिक्षकांनी मनमाड नगरपरिषद प्रशासन, नगराध्यक्ष योगेश पाटील तसेच उपस्थित नगरसेवकांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या