Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाची तयारी सुरू; जाहीर बैठकीचे आयोजन

 


मनमाड प्रतिनिधी : मनमाड शहरातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला अधोरेखित करणाऱ्या मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती, मनमाड 2026 तर्फे यंदाच्या श्रीराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक बुधवार, दिनांक 04 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता श्रीराम मंदिर, आठवडे बाजार, मनमाड येथे होणार आहे.

सालाबादप्रमाणे सन 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही गुरुवार, दिनांक 26 मार्च 2026 रोजी चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचेही नियोजन करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हिंदुत्ववादी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हितचिंतक नागरिकांनी मोठ्या संख्येने जाहीर बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शहराच्या धार्मिक वैभवाला साजेसा आणि उत्साहपूर्ण श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचे समितीने नमूद केले आहे.
—ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती, मनमाड 2026

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या