मनमाड शहरासाठी मंजूर झालेल्या भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष मा. श्री योगेश भाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष दालनात संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस मुख्याधिकारी मा. श्री शेषराव चौधरी, नगरपरिषदेचे अधिकारी, सर्व नगरसेवक, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, व संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
या बैठकीत नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी भुयारी गटारीचे काम जलद गतीने, उत्कृष्ट दर्जाने व मुदतीत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या. तसेच पाईप टाकताना काँक्रीट रोड कटरने कट करणे, खोदकामानंतर मातीची योग्य विल्हेवाट लावणे, गटारासाठी बांधलेले चेंबर दर्जेदार करणे व नियमित क्युरिंग करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले.
तसेच नगरपरिषदेचे अधिकारी उप अभियंता दीपा पगार, अनिल गवळी, मुक्तार शेख व इतर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच दुसऱ्या टप्प्यात झालेल्या बैठकीत मनमाड शहरासाठी पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजना मंजूर करून कामे सुरू झाल्याबद्दल नगराध्यक्ष योगेश भाऊ पाटील व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी मा. आमदार श्री सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले.
तसेच मनमाड नगरपरिषदेचे अधिकारी —
प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी श्रीमती आश्लेषा जाधव, उपमुख्याधिकारी पुष्पक निकम, बांधकाम अभियंता संजय संदांशीव, अभियंते अनिल गवळी, नगररचना अभियंता कामिनी चव्हाण, शुभम जाधव, उमेश महाजन, लेखापाल संतोष दराडे, लेखापरीक्षक हाराळे साहेब, आरोग्य निरीक्षक वैभव भामरे, विद्युत अभियंता जितेंद्र सोनारे, अग्निशमन विभाग प्रमुख श्री पाटील, सायकल निरीक्षक मनोज मगर, सिटी को-ऑर्डिनेटर बागुल मॅडम, शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी श्री तरडे सर, सुवर्णा जयंती रोजगार योजना विभागाचे श्री विलास कातकडे, मुक्तार शेख, सभालिपिक किरण आहेर यांच्यासह भुयारी गटार व करंजवण पाणीपुरवठा योजनेचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अधिकारी व कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत विविध प्रभागांतील पाणीपुरवठा, आरोग्य व भुयारी गटार कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.

मनमाड नगरपरिषद.नगर अध्यक्ष योगेश पाटील.
मनमाड शहरासाठी भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजना सध्या सुरू असून करंजवण पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे. या योजनेतून अनेक नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आले असून, त्या कनेक्शनची पाईप फिटिंग करून पाणी थेट घरात घेण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले. यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल तसेच निळ्या पाईप लाईन दबल्या जाण्यामुळे निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या तक्रारीही कमी होतील, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांकडून प्राप्त तक्रारींची दखल घेत या बैठकीत विशेषतः भुयारी गटार योजनेवर सविस्तर चर्चा झाली. गटारीचे पाईप टाकताना काँक्रीट रोड कटरने व्यवस्थित कट घेणे, खोदकामानंतर निघालेली माती त्वरित हटवणे, गटारीसाठी बांधलेले चेंबर मजबूत व दर्जेदार बांधून त्यांना नियमित क्युरिंग (पाणी मारणे) करणे आवश्यक असल्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.
भुयारी गटार योजनेचे काम जलद गतीने व ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अधिकाऱ्यांना नगराध्यक्ष श्री. योगेश पाटील यांनी कडक सूचना दिल्या.
![]() |
| मनमाड नगरपरिषद.नगर अध्यक्ष योगेश पाटील. |

0 टिप्पण्या