Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडमध्ये शिवजयंती उत्सव दिमाखात; उस्मानिया चौकात उत्साहाचे वातावरण


 मनमाडमध्ये शिवजयंती उत्सव दिमाखात; उस्मानिया चौकात उत्साहाचे वातावरण

मनमाड : मनमाड नगरपरिषद शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. शहरातील उस्मानिया चौक येथे आकर्षक सजावट, सुंदर रांगोळी आणि भक्तिमय वातावरणात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमात अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य. फरान खान, मनमाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री व सौ. योगेश पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसेच नगरपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य यांच्या शुभहस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.


कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक राज्यगीत गायन करून वातावरण देशभक्तीने भारावून टाकले. पुढे मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती करण्यात आली.

समारोप प्रसंगी सामूहिक राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यानंतर उपस्थितांना लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मनमाड नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भव्य सजावटीमुळे उस्मानिया चौक परिसर दिवसभर उत्साहाने उजळून निघाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या