Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

इंदोर–पुणे महामार्गावर मनमाडला पुन्हा भीषण ट्रॅफिक जाम; दहावी बोर्ड परीक्षादेनारे विद्यार्थी व पालक धास्तावले!

 

मनमाड प्रतिनिधी | 18 फेब्रुवारी

मनमाड शहराच्या मध्यातून जाणारा इंदोर–पुणे महामार्ग पुन्हा एकदा तीव्र वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आला आहे. मंगळवारी सकाळी सलग दोन ते तीन तास ट्रॅफिक जाम झाल्याने शहरवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र यावेळी सर्वाधिक चिंता निर्माण झाली आहे ती इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षार्थींच्या भवितव्याची.

नादुरुस्त कंटेनरमुळे कोंडीची साखळी

सकाळच्या गर्दीच्या वेळी रेल्वे पुलावर एक कंटेनर अचानक नादुरुस्त झाल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यातच दोन-तीन अवजड कंटेनर एकाच वेळी मार्गावर आल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. रेल्वेचा अरुंद पूल हा समस्येचे मूळ ठरत असल्याचे याआधीही अनेकदा निदर्शनास आले आहे.

येवला बाजूकडील अनकवाड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर मालेगावकडेही मोठ्या प्रमाणात वाहने अडकली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नादुरुस्त कंटेनर क्रेनच्या सहाय्याने बाजूला केला आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

दहावी बोर्ड परीक्षेवर संकटाची छाया

20 फेब्रुवारीपासून शहरात दहावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत. विशेष म्हणजे परीक्षेची दोन्ही केंद्रे या महामार्गालगतच असल्याने वाहतूक कोंडीचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.
पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून,
परीक्षेला उशीर होण्याची चिंता वाहतुकीत अडकण्याची शक्यता मानसिक तणावात वाढ अशा अनेक प्रश्नांनी परीक्षार्थी धास्तावले आहेत. वर्षभराच्या परिश्रमाचे फळ असलेल्या बोर्ड परीक्षेच्या काळात अशा कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी तीव्र मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा

किमान परीक्षांच्या कालावधीत तरी:अवजड वाहनांना पर्यायी मार्ग देणे पुलाजवळ वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथक तैनात करणे परीक्षेच्या वेळेत काही काळ वाहतूक वळवणे अशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.मनमाड शहरात ट्रॅफिक जाम हा नित्याचा विषय बनला असला तरी, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न अधिक गंभीर आहे.

प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या निर्णयाकडे लागले आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेगळे धोरण स्वीकारले जाईल का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या