Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगरपरिषदेचा ३६७ कोटींचा अर्थसंकल्प सादर; सौरऊर्जा प्रकल्पावर भर

 

मनमाड | दि. १६ फेब्रुवारी २०२६.मा. आमदार सुहास अण्णा कांदे व .अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. फरानदादा खान यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेच्या निवडणुकीत भव्य यश संपादन केल्यानंतर जवळपास पाच वर्षांनी मनमाड नगरपरिषदेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

नगरपरिषदेच्या लेखा विभागाकडून २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प नगरपरिषदेचे अध्यक्ष तथा स्थायी समितीचे सभापती. योगेश पाटील यांनी समितीसमोर सादर केला. यावेळी लेखापाल संतोष दराडे व वरिष्ठ लिपिक आनंद आवटी यांनी अर्थसंकल्पातील विविध तरतुदींवर सविस्तर अहवाल सादर केला.

बैठकीदरम्यान अध्यक्ष तथा सभापती आणि समिती सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. मनमाड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजना, पथदीप व्यवस्था व घनकचरा व्यवस्थापनावर होणारा वाढता वीज खर्च लक्षात घेता, या खर्चावर आळा घालण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी जास्तीत जास्त तरतूद करण्याची सूचना अध्यक्षांकडून करण्यात आली. तसेच नागरिकांना प्राथमिक सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देताना नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीनेही विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.


मा. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नांतून सुरू असलेल्या भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना तसेच विविध शासकीय योजनांसाठी उपलब्ध निधी आणि नगरपरिषदेचे एकूण उत्पन्न यांचा विचार करून सुमारे ३६७ कोटी रुपयांचा आणि ५ लाख ५० हजार रुपये शिल्लक दर्शविणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

स्थायी समिती सभापती तसेच सदस्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्या समाविष्ट करून मूळ अर्थसंकल्प मनमाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस नगरपरिषदेचे अध्यक्ष तथा स्थायी समिती सभापती. योगेश पाटील, स्थायी समिती सदस्य पिंटू शिरसाट, डॉ. सुहास जाधव, अमजद पठाण, विशाल अहिरे, मुकुंद एलिंजे, अमिन पटेल, पूजाताई लालसरे, रेश्माताई पगारे, पूजाताई साबळे, तसेच लेखापाल संतोष दराडे, आनंद आवटी, बांधकाम अभियंता संदानशिव, नगररचनाकार शुभम जाधव, आरोग्य निरीक्षक वैभव भामरे आणि सभा लिपिक किरण आहेर उपस्थित होते.

मनमाडच्या विकासासाठी ऊर्जा बचत, मूलभूत सुविधा बळकटीकरण आणि उत्पन्नवाढीचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प ठरणार असल्याचे संकेत बैठकीतून मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या