Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

टिपू सुलतान बद्दलच्या वक्तव्यामुळे वंचित बहुजन आघाडी ची कारवाई जालना जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आले.

 

टिपू सुलतान बद्दलच्या वक्तव्यामुळे वंचित बहुजन आघाडी ची कारवाई जालना जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आले. 

जालना, दि. 16 फेब्रुवारी 2026 : वंचित बहुजन आघाडी ने जालना जिल्ह्यातील युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांना पदावरून मुक्त केल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, विजय लहाने यांनी प्रथम स्वातंत्र संग्राम स्वातंत्र्या पूर्व काळात ब्रिटिशांविरोधात लढलेल्या टिपू सुलतान यांच्याबाबत पक्ष नेतृत्वाशी चर्चा न करता केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित वक्तव्याशी पक्ष सहमत नसून, ही कृती पक्ष शिस्तीचा भंग मानण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांना वंचित बहुजन युवक आघाडी, जालना जिल्हाध्यक्ष या पदाच्या जबाबदारीतून तात्काळ पदमुक्त करण्यात आले आहे.

पक्षाच्या वतीने जालना जिल्ह्यातील महिला, पुरुष, युवक व विद्यार्थी आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्याचे पत्र सोशल मीडियावर वायरल होतांना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या