Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात भटक्या कुत्र्याची आरामशीर उपस्थिती; मंत्रालय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.?

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे नियंत्रण कक्ष मानले जाणारे राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, मंत्रालय येथे एका भटक्या कुत्र्याने आरामात झोप घेतल्याचा फोटो समोर आला असून, यामुळे मंत्रालयातील स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आपत्ती, पूर, भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या प्रसंगी 24x7 कार्यरत असलेले हे केंद्र राज्य प्रशासनाचे ‘वॉर रूम’ म्हणून ओळखले जाते. अशा संवेदनशील आणि उच्च सुरक्षा असलेल्या ठिकाणी भटक्या प्राण्यांची मुक्त वावर दिसणे हे प्रशासनाच्या दक्षतेबाबत चिंताजनक मानले जात आहे.

छायाचित्रात केंद्राच्या मुख्य फलकासमोरच कुत्रा शांतपणे झोपलेला दिसत आहे. मंत्रालयासारख्या अत्यंत संरक्षित परिसरात ही परिस्थिती कशी निर्माण झाली, सुरक्षा रक्षकांची जबाबदारी काय, तसेच स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलली जातात, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे.अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे. 

तज्ज्ञांच्या मते, आपत्कालीन नियंत्रण कक्ष हे अत्यंत संवेदनशील ठिकाण असते. येथे येण्या-जाण्यावर काटेकोर नियंत्रण, नियमित स्वच्छता आणि निर्बंध आवश्यक असतात. अन्यथा सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण होऊ शकतो असे मत नागरिकांनी व्यक्त केले. मंत्रालयात प्रवेश करताना आत्ता ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असून डीजी प्रवेश या App वरून प्रवेश पास बनवले जातो आणि प्रवेश पास मिळाल्यानंतरच नागरिकांना मंत्रालयात प्रवेश दिला जातो. परंतु असे भटके प्राणी बिना पास दिसून येत आहे. जर अशा भटक्या कुत्र्यांनी एखाद्या महामहीम मंत्र्यावर तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्यावर हल्ला केल्यास ही बाब महाराष्ट्राला लाजिरवाणी असेल असे नागरिकांनी मत व्यक्त केले.

दरम्यान, सामाजिक माध्यमांवर हा फोटो व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. “राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या केंद्रातच अशी परिस्थिती असेल, तर सामान्य शासकीय कार्यालयांची अवस्था काय असेल?” असा सवाल नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे.

या घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच मंत्रालय परिसरात भटक्या प्राण्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या