Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

एच.ए.के. हायस्कूलच्या आयशा गाजियानी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; शाळेतर्फे सत्कार समारंभ



मनमाड: रोटरी क्लब ऑफ मनमाड यांच्यातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित आदर्श शिक्षक पुरस्कार एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मनमाड येथील विद्यार्थीप्रिय शिक्षिका आणि संस्थेच्या सक्रिय सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. या यशस्वी कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

सत्कार समारंभात शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे , पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर,शेख आरिफ कासम यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी आयशा गाजियानी यांच्या शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्याची प्रशंसा करत सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आयशा गाजियानी यांनी आपल्या प्रेरणादायी शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निष्ठेमुळे शाळेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे शाळेच्या कर्मचारी वृंदात आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

रोटरी क्लब ऑफ मनमाड आणि एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांनी आयशा मॅडम यांच्या कार्याला सलाम करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभकामना व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या