Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

"शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ मनमाडचा आदर्श शिक्षकांचा भव्य सन्मान; पर्यावरण संवर्धनाचा संदेश"

 

रोटरी क्लब ऑफ मनमाडतर्फे शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कारांचे भव्य वितरण

मनमाड, ५ सप्टेंबर २०२५: स्वातंत्र्य भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन रोटरी क्लब ऑफ मनमाडने यंदा मोठ्या उत्साहात साजरा केला. शहर आणि परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा भव्य सोहळा संपन्न झाला. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्री. विजय करे, मनमाड नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री. पुष्पक निकम पाटील, शिक्षण मंडळाचे श्री. विकास तरडे, श्री. किरण आहेर, श्री. किशोर अहिरे आणि रोटरीचे ज्येष्ठ सदस्य श्री. सुभाष गुजराथी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी सदस्य श्री. गुरुजीत सिंह कांत यांनी करत शिक्षकांच्या समाजातील योगदानावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगतात श्री. विजय करे यांनी शिक्षकांची राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. श्री. किरण आहेर यांनी शिक्षक हे समाज आणि विद्यार्थ्यांचे आदर्श घडविणारे शिल्पकार असल्याचे सांगत सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे नगर परिषदेतर्फे अभिनंदन केले. श्री. हर्षद गद्रे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करत उपस्थितांना प्रेरणा दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. स्वप्नील सूर्यवंशी यांनी तर अध्यक्ष डॉ. भूषण शर्मा यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. सचिव कौशल शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले. प्रकल्प संयोजक रोटे. प्रकाश भुजबळ, श्री. देवराम सदगीर, रोटे. आनंद काकडे आणि रोटे. हरप्रीत सिंह चोटमुरादी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.


विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांना नगर परिषदेतर्फे झाडांची रोपे भेट देण्यात आली. पल्लवी केटरर्स, जी. एल. एस. टीम आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. 


  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या