Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहरात ईद ए मिलाद जुलूसात 72 लबैक ग्रुप तर्फे जुल्फेकार तलवारीचे आकर्षक देखावे

 


मनमाड शहरात ईद ए मिलादुन्नबी ﷺ जुलूस मोठ्या उत्साहात व धार्मिक श्रद्धेने साजरा करण्यात आला. या जुलूसात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मुस्लिम कॉलनी येथील 72 लबैक ग्रुप, मनमाड तर्फे इस्लामी इतिहासातील सुप्रसिद्ध जुल्फेकार तलवार याचे देखावे सादर करण्यात आले.

जुल्फेकार तलवार ही इस्लामिक इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. ही तलवार हजरत अली (अ.स.) यांना प्रेषित मुहम्मद ﷺ यांनी भेट स्वरूपात दिली होती. तिचे विशेष स्वरूप दोन टोकांचे आहे, ज्यामुळे ती अन्य तलवारींपेक्षा वेगळी दिसते. धैर्य, न्याय आणि सत्यासाठीच्या लढाईचे प्रतीक म्हणून या तलवारीला विशेष महत्त्व आहे.

जुलूसामध्ये सादर करण्यात आलेल्या या तलवारीच्या देखाव्याने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले. सजवलेल्या ट्रॅक्टरवर सादर केलेल्या जुल्फेकार तलवारीने जुलूसाला एक वेगळी शोभा प्राप्त झाली. या वेळी ऐतिहासिक प्रतीकाचे दर्शन होताच मुस्लिम समाज बांधवानी उत्साहाने नारे दिले. महत्त्वाचे म्हणजे ईद-ए-मिलाद जुलूस मध्ये सर्व बहुजन बांधव देखील या धार्मिक तलवारीचे दर्शन करीत होते.

ईद ए मिलादुन्नबी ﷺ निमित्ताने शहरात सर्वत्र धार्मिक वातावरण पाहायला मिळाले. यावेळी 72 लबैक ग्रुप चे, जीलानी शेख,अबु तुराब खान, असलम शेख, अल्तमश शेख,अफजल पठाण, सिकंदर मिर्जा, शेरू भाई (पटेल) कादीर शेख,नाजीम सैय्यद, रफत खान, वसीम शेख, मोहम्मद अली शेख. अजहर सैय्यद,जाकीर तांबोळी. समी सैय्यद,सलमान बागवान, नावेद शेख, अबुजर शेख, अनिस शेख, बासीद शेख, हसनैन शेख,अहेमद शेख.शाहरुख शेख,रजा शेख,फायक सैय्यद,जावीद शेख (गुडडू) असे अनेक सभासद उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या