मनमाड: शहराचे आराध्य दैवत आणि पंचक्रोशीत नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंडळाच्या पार्थिव गणेश मूर्तीची 29वी विसर्जन महामिरवणूक आज सकाळी पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि धार्मिक उत्साहात संपन्न झाली. श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टतर्फे 1997 पासून सातत्याने आयोजित होणारी ही मिरवणूक यंदाही "आम्ही परंपरा पाळतो, आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो" या ब्रीदवाक्याला साजेशी ठरली.
मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या शुभहस्ते मंदिरात महाआरती आणि नारळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला. आकर्षक रांगोळी, गोंधळी पथकाची लोककला, शिवकालीन दवंडी, वाद्यवृंद, सनई-चौघडा, घोडे-उंटस्वार युवती, आणि श्री ढोल पथक मनमाडच्या ढोल वादनाने मिरवणूक लक्षवेधी ठरली. चंद्र-सूर्य, भगवा ध्वज आणि फुलांनी सजवलेली पालखी यंदाच्या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते. शंखनाद आणि गणेश जयजयकाराने परिसर दुमदुमला.
मिरवणूक मार्गावर महिलांनी ठिकठिकाणी औक्षण आणि आरती केली, तर सर्व भाविकांना खडीसाखर आणि मोदकाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. शहरातील मुख्य चौकात पालखीवर जोरदार पुष्पवृष्टी झाली. या मिरवणुकीत महिला, युवक-युवती, आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले, तर नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी मार्गावर गर्दी केली होती.
संयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितीन पांडे, विश्वस्त शेखर पांगुळ, गोविंद रसाळ, प्रज्ञेश खांदाट, नारायण फुलवाणी, भिकाजी कुलकर्णी यांच्यासह मंडळाचे रामदास इप्पर, भरत छाबडा, शिवाजी सानप, दीपक शिंदे, मनोज पवार, अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त आदींनी केले. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्टतर्फे सर्व गणेशभक्तांचे आभार मानण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या