श्री. आनंद धर्मार्थ दवाखान्याचे 47 वर्षांचे समाजसेवेचे यशस्वी पर्व: 1650 रुग्णांना नेत्रसेवा"
मनमाड येथील भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रायोजकत्वात व श्री. आनंद धर्मार्थ दवाखान्याच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबर महिन्यातील 40 वे भव्य नेत्र चिकित्सा शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिराचे उद्घाटन भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे चेयरमैन श्री. अशोकराव सानप (मामू) आणि व्हाइस चेयरमैन श्री. प्रदीपजी बोगावत यांच्या शुभहस्ते झाले. दृष्टिहीन आणि गरजू रुग्णांसाठी समाजबांधिलकी जपत, भाग्यलक्ष्मी पतसंस्थेच्या सर्व सभासद आणि कर्मचारी वृंदाने मोलाचे सहकार्य केले.
श्री. आनंद धर्मार्थ दवाखान्याची स्थापना 1988 साली श्री. सुशील अमृत जैन महिला मंडळाच्या नेतृत्वात झाली असून, गेल्या 47 वर्षांपासून “गौर गरीबांची रुग्णसेवा आणि जैन धर्माच्या विचारांचा प्रसार” या उद्देशाने अविरत समाजसेवा करत आहे. या शिबिराद्वारे आतापर्यंत 1650 रुग्णांची नेत्र तपासणी आणि 150 रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया रोटरी आय हॉस्पिटल, मालेगाव यांच्या सहकार्याने पूर्ण झाल्या. स्व. डॉ. सी.एच. बागरेचा यांच्या प्रेरणेने दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आयोजित होणारे हे शिबिर गेल्या 40 महिन्यांपासून अव्याहतपणे सुरू आहे.
श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाने या कार्याची दखल घेत गुरु भगवंतांसमोर प्रशंसा केली असून, ठाणा गुरुनी मैया यांच्याकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. शिबिराच्या यशस्वीततेसाठी श्री. आनंद धर्मार्थ परिवारातील मार्गदर्शक संस्थापक डॉ. सुनील बागरेचा, अध्यक्ष डॉ. दिलीप मुथा, उपाध्यक्ष डॉ. सतीश चोरडिया, खजिनदार डॉ. आकाश लुणावत, सचिव सचिन लुणावत, मार्गदर्शक दीपक मुनोत यांच्यासह डॉ. निलेश राठी, सुनील बोगावत, राजेंद्र मुथा, डॉ. विकास चोरडिया, डॉ. धीरज बरडिया, डॉ. नितिन जैन, अशोक भंडारी, डॉ. पारस जैन, डॉ. सागर जैन, पीयूष भंडारी, योगेश ताथेड आणि राजन रहांडडाले यांच्या टीमवर्कने शिबिराला उत्कृष्ट स्वरूप प्राप्त झाले.
या शिबिराने दृष्टिहीन गरजूंना केवळ नेत्रसेवाच नव्हे, तर समाजसेवेचा एक आदर्श प्रस्थापित केला आहे. भविष्यातही जैन बांधवांच्या आशीर्वादाने आणि समाजाच्या सहकार्याने अशीच कार्ये अव्याहतपणे सुरू राहतील, असा विश्वास श्री. आनंद धर्मार्थ दवाखाना परिवाराने व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या