मनमाड, दि. 04 सप्टेंबर 2025: हजरत मोहम्मद पैगंबर जयंती आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त आयोजित मिरवणुका सौहार्दपूर्ण आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी मनमाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला मनमाड शहरातील मुस्लिम समाजातील सर्व प्रमुख व्यक्ती, माजी नगरसेवक, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मिरवणुकीतील डीजे आणि रथ देखावे काढणाऱ्या मंडळांना सकाळी 10 वाजेपर्यंत पाकीजा कॉर्नर, हायवे रोड येथे उपस्थित राहण्याचे आणि आपले रथ व देखावे लवकरात लवकर काढण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे हायवे रोडवरील वाहतूक कोंडी टाळली जाईल, असे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले. या निर्णयाचे मुस्लिम समाजाने स्वागत केले असून, सर्व मंडळांनी लवकरात लवकर डीजे आणि रथ काढण्याची कबुली दिली आहे.
मिरवणुकीसाठी डीजे सिस्टीमच्या परवानगी घेण्याचे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व मंडळांनी काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन पोलीस अधिकाऱ्यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आश्वासन दिले. बाईट मनमाड पोलीस निरीक्षक. विजय करे
बैठकीला उपस्थित प्रमुख व्यक्ती:
माजी नगरसेवक मुश्ताक बब्बु कुरेशी, लियाकत शेख, अमिन पटेल, अकबर सोनावाला, सादिक तांबोळी, नाजिम शेख, समाजसेवक कदिर शेख , अज्जु भाई शेख, कयाम सैय्यद, इमरान शहा, अकबर शहा, जावीद शेख, आसिफ शेख, शब्बीर शेख,नईम शेख आणि पत्रकार आफरोज अत्तार यांच्यासह शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीमुळे मनमाड शहरात ईद-ए-मिलाद-उन-नबीचा उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या