Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

येवला तालुक्यात शेतकऱ्यांच्या मोटारसायकल व इलेक्ट्रिक मोटार चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद



नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शेतकऱ्यांच्या मोटारसायकल आणि इलेक्ट्रिक मोटार चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून, तब्बल 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे येवला तालुका पोलीस ठाण्याच्या गु.र.नं. 349/2025 आणि 344/2025 या दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता असून, पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/2651 पल्हाळ यांच्याकडून तपास सुरू आहे.


सदर कारवाई येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, हर्षवर्धन बहिर, सचिन वैरागर, पंकज शिंदे, सागर बनकर आणि राजू डुबे यांनी मा. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या