Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

रोटरी क्लब ऑफ मनमाडतर्फे क्रांती दिनानिमित्त भव्य क्रांती दौड यशस्वी; १२०+ विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

 


मनमाड: क्रांती दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ मनमाडतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य क्रांती दौड (मिनी मॅरेथॉन) चे आयोजन करण्यात आले. शहरातील १० माध्यमिक शाळांमधील १२० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.

स्पर्धेची सुरुवात हिरा लॉन येथून रोटरीचे ज्येष्ठ सदस्य आणि क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत फित कापून झाली. हिरा लॉन ते लासलगाव चौफुली या मार्गावर मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या.

विजेते:मुलांमध्ये:

- प्रथम: साई अण्णा सरोदे (संत झेवियर हायस्कूल)  
- द्वितीय: ओम विठ्ठल डोंगरे (संत झेवियर हायस्कूल)  
- तृतीय: सार्थक ज्ञानेश्वर खडताळे (संत झेवियर हायस्कूल)  
- उत्तेजनार्थ: समर्थ दीपक राऊतराये (छत्रे हायस्कूल), तन्मय कैलास गांगुर्डे (एम आर एम व्ही इंडियन हायस्कूल)  

मुलींमध्ये:

- प्रथम: अमृता अशोक जगताप (संत झेवियर हायस्कूल)  
- द्वितीय: आर्या कृष्णा झाल्टे (संत झेवियर हायस्कूल)  
- तृतीय: पर्ल ब्रुनो नातो (संत झेवियर हायस्कूल)  
- उत्तेजनार्थ: अश्विनी श्रावण नागरे (छत्रे हायस्कूल), मेघा संजय राऊत (संत झेवियर हायस्कूल) 

 
स्पर्धेत सहभागी सर्व शाळांना सहभाग प्रमाणपत्र, तर विजेत्यांना शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. भुषण शर्मा, सेक्रेटरी कौशल शर्मा, ज्येष्ठ सदस्य सुभाष गुजराथी, गुरुजीत सिंह कांत, अनिलदादा काकडे, देवराम सदगीर, आनंद लोढा, स्वप्नील सूर्यवंशी, दिनेश बेदमुथा, प्रकाश भुजबळ, चेतन सुतार यांच्यासह हिरा लॉनच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. 

राष्ट्रगीत आणि चहापानाने स्पर्धेची सांगता झाली. परिसरातील नागरिक, क्रीडा शिक्षक आणि रोटरी सदस्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या