नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने येवला तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. येवला शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभुळगाव शिवारात गावठाणच्या पडित जागेवर चालणाऱ्या अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
या छाप्यात संतोष जगताप (वय 46), बाबासाहेब सुरासे (वय 40), मनोहर आहेर (वय 28), राम भड (वय 29) यांना ताब्यात घेण्यात आले, तर एक आरोपी राज कांबळे फरार झाला आहे. पोलिसांनी 1,09,300 रुपये रोख, दोन कार (ह्युंदाई आय20, मारुती स्विफ्ट), दोन स्प्लेंडर मोटरसायकली आणि मोबाइल फोन असा एकूण 10,50,300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परप्रांतीयाकडून पिस्तूल जप्त:दुसऱ्या कारवाईत, 3 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवला शहरातील कोपरगाव रोड परिसरात हॉटेल कैलासजवळ गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे शरबजीत रामलाल यादव (वय 40, मूळ रा. उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांचे नेतृत्व आणि कारवाई:या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकाने प्रभावी कामगिरी केली. पथकात पो. प्रकाश भालेराव, गोरक्षनाथ संवत्सरकर, रावसाहेब कांबळे, योगिता काकड, प्रविण काकड, सागर काकड, विश्वनाथ धारबळे, संतोष दोंदे, एकनाथ हळदे, केतन कापसे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम आणि नितीन गांगुर्डे यांचा समावेश होता.नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध व्यवसायांना चाप बसला असून, परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या